Ad will apear here
Next
‘पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तत्‍काळ पंचनामे करावेत’
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश

पुणे :  पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके, तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून, मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे. शहरी भागामध्येही घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे चार दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. ‘संबंधित तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी संयुक्‍तपणे पंचनामे करावे,’ असेही जिल्‍हाधिकारी राम यांनी स्‍पष्‍ट केले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम
जिल्हा प्रशासनाकडून आपदग्रस्तांना तातडीने करावयाची मदत देण्यात आली आहे. महानगरपालिका तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फतदेखील पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याविषयी तत्काळ कार्यवाही करून प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले.

राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

नुकसानीबाबत काही शंका असल्‍यास टोल फ्री क्रमांक १०७७ आणि पुणे येथील आपत्‍ती नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२०-२६१२३३७१ येथे संपर्क करावा, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZZHCG
Similar Posts
मतदान जनजागृतीसाठी विशेष चित्ररथ पुणे : विधानसभा निवडणुकीत मतदान जनजागृती करण्यासाठी कोठारीज रॉयल ऑरगॅनिक फूड्सचे प्रफुल्ल कोठारी यांच्या सहकार्याने विशेष चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन नुकतेच पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते झाले.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज पुणे : ‘विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत मतदान व मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिली.
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौड पुणे : माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्टच्या वतीने गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.
महाजनादेश यात्रेच्या प्रचारार्थ डिजिटल चित्ररथ सज्ज पुणे : महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार व कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन नुकतेच पुण्यात खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language